Home अकोले दारिद्र्याची शोधयात्रा अहवाल प्रकाशित: हेरंब कुलकर्णी

दारिद्र्याची शोधयात्रा अहवाल प्रकाशित: हेरंब कुलकर्णी

 दारिद्र्याची शोधयात्रा अहवाल प्रकाशित: हेरंब कुलकर्णी

ललित मुतडक राजूर प्रतिनिध ी:- 
                     महाराष्ट्रातील दारिद्र्याची स्थिती नेमकी काय आहे ? यावरील महाराष्ट्राच्या ग्रामीण २४ जिल्ह्यातील १२५ गरीब गावांना भेट देवून दारिद्र्याच्या स्थितीचा अभ्यास करून या अभ्यासावरचा हेरंब कुलकर्णी यांचा अहवाल समकालीन प्रकाशन पुणे यांनी’ दारिद्र्याची शोधयात्रा’ या नावाने नुकताच  प्रसिद्ध केला आहे.      
        भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यावर गरिबी कमी झाली का ? या विषयावर दोन्ही बाजूने वाद झाले.तेव्हा दारिद्र्याची स्थिती नेमकी काय आहे ? हे बघण्यासाठी प्रत्यक्ष सर्वात गरीब लोकांना भेटावे व वस्तुस्थिती बघावी यासाठी १२५ गावांना वस्त्यांना,पालांना भेटी दिल्या व दारिद्र्याचा अभ्यास केला.              
             विदर्भ मराठवाड्यातील बहुतेक सर्व जिल्हे,उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,नाशिक, कोकणातील रायगड,पालघर,ठाणे व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांना हेरंब कुलकर्णी यांनी भेटी दिल्या.प्रत्येक जिल्ह्यातील दोन गरीब तालुके व त्या दोन तालुक्यातील साधारणपणे ५ गरीब गावे निवडली.गरीब लोकांशी चर्चा करताना लोक गरीब का आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला.त्या गावातील शेतीची स्थिती,सिंचन,शेतीमालाची विक्री,शेतीच्या समस्या,लोक काय खातात ? त्या अन्नाचा दर्जा, रेशन मिळते का?रोजगार किती दिवस मिळतो ? रोजगार हमीची कामे निघतात का ? लोक स्थलांतर करतात का ?कोणत्या कामासाठी ? स्थलांतर केलेल्या ठिकाणी काय हाल होतात ? ग्रामीण भागातील कर्जबाजारी लोकांची स्थिती ?दारूमुळे उध्वस्त होणारे संसार कसे आहेत? बचत गटाची चळवळ का रोडावली ? शिक्षणाची स्थिती कशी आहे ? आरोग्यावर किती खर्च करावा लागतो ? आरोग्यखर्चामुळे होणारे कर्ज, नोकरशाही कसे काम करते ? शासकीय योजनांचा लाभ मिळतो का ? अशा विषयांवर लोकांशी बोलुन दारिद्र्य शोधण्याचा प्रयत्न केला.ग्रामीण भागात दलित कसे जगतात ? हे अनेक दलित वस्त्यात जाऊन पाहिले.तर भटक्या विमुक्तांची स्थिती सर्वात विदारक असल्याने भटक्यांच्या अनेक पालांवर जाऊन त्यांचे जगणे बघितले.असंघटीत मजुरांची स्थिती बघण्यासाठी अनेक असंघातित व्यवसाय करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. 
              ही सर्व निरीक्षणे विषयनिहाय एकत्र करून या अहवालात मांडली आहेत.गरिबीचा प्रश्न आपल्या सामाजिक परिघावरून हळूहळू वेगाने दूर ढकलला जातो आहे.तो केंद्रस्थानी राहावा व या अगतिक,दीन लोकांचे जगणे,त्यांचे प्रश्न समाजाच्या चिंतनाचा विषय व्हावा व राज्यकर्ते,धोरण आखणारे अधिकारी,विविध सामाजिक संस्था,पत्रकार,विचारवंत,अभ्यासक यांना दारिद्र्याच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी feedback म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल अशी भावना हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Website Title: Publication of Poverty Line Heramb Kulkarni


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here