Home पुणे Rape | मैत्रिणीच्या घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape | मैत्रिणीच्या घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Pune Crime Calling a friend's house and rape a minor girl

पुणे | Pune Crime News: मैत्रिणीच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एकाने बळजबरीने बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुकुंद काप्पासिंग लोधी याच्याविरुद्ध म्हाळुंगे पोलीस चौकीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. सदर घटना डिसेंबर २०२१ मध्ये खराबवाडी येथे घडला आहे.

याबाबत पिडीत मुलीने चाकण पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद रविवारी दिली. त्यानुसार पोलिसांनी मुकुंद काप्पासिंग लोधी वय २० रा. म्हाळुंगे मूळ रा. मध्यप्रदेश याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपी घरामध्येच होता. त्याने फिर्यादिसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने जवळीक साधून तिच्यासोबत गैरकृत्य केले. त्यावेळी तिची मैत्रीण बाहेर गेली होती. तिने घराचा दरवाजा बाहेरून ओढून घेतला होता. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तसेच कुणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर आरोपीने तिने ते चार वेळा मैत्रिणीच्या घरी बोलावून अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस करीत आहे.

Web Title: Pune Crime Calling a friend’s house and rape a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here