Home अहमदनगर रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा नगरचा, पोलिसांनी केले गजाआड

रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा नगरचा, पोलिसांनी केले गजाआड

Rupali Chakankar from Nagar who threatened to kill him Arrested

Ahmednagar News| नगर: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासे | Newasa) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. रूपाली चाकणकर मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना धमकीचा फोन आला होता.

पुढच्या 24 तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा हा धमकीचा फोन होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Rupali Chakankar from Nagar who threatened to kill him Arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here