Home ठाणे Prostitution: घरात शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस शिक्षा

Prostitution: घरात शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस शिक्षा

Crime News: घरात कुंटणखाना (Prostitution Business) चालविणाऱ्या महिलेस सक्तमजुरीची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश.

Punishment of forced labor for a woman running Prostitution Business

ठाणे : एका अल्पवयीन मुलीला पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून आपल्या घरात शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणा-या खातिजा मुन्नाकी शेख या महिलेला तीन वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास दहा दिवस सक्त मजूरीची शिक्षा ठाण्याच्या सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी मंगळवारी सुनावली. याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात चार वर्षांपूर्वी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

नवी मुंबईतील तुर्भे भागात राहणारी एक महिला तिच्याच घरात कुंटणखाना चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर देसाई यांच्या पथकाने एका बनावट गिहाईकाच्या मदतीने त्याठिकाणी धाड टाकली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलींना पैशाचे अमिष दाखवून तिच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणा या खातिजा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध ३० मे २०१२८ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा, पिटा तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात मंगळवारी झाली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपी महिलेला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी पुरावे पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपी खातिजा हिला कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: Punishment of forced labor for a woman running Prostitution Business

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here