Home संगमनेर Sangamner: संगमनेरात मद्यपी महिलेचा दोन तास राडा

Sangamner: संगमनेरात मद्यपी महिलेचा दोन तास राडा

Radha of a drunken woman for two hours in Sangamner

संगमनेर | Sangamner: मद्य घेऊन धुंदीत असलेल्या एका महिलेने काल दुपारी शहरातील विविध ठिकाणी दोन तास गोंधळ घालत अनेकांना दमदाटी व शिवीगाळ करत दुकानांमधील सामानाची तोडफोड करण्यात आली. तिचा सुरु असलेला राडा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दीच केली होती.  

शहरातील मेनरोड परिसरात चावडी येथे असणार्‍या तलाठी कार्यालयासमोर काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेली ३० वर्षीय महिला अचानक अवतरली. तिने जास्त मद्य सेवन केल्याने तिचा स्वतःवरील ताबा सुटलेला होता. चावडी परिसरातील अनेक नागरिकांना शिवीगाळ केली. तिने घातलेला गोंधळ समजल्याने पोलिसांचे वाहन घटनास्थळी आले. पोलिसांचे वाहन पाहताच तिने पोलिसांनाही शिवीगाळ सुरू केली.

माझ्यावर कारवाई करून दाखवा असे खुले आव्हान पोलिसांना दिले. माझ्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला बोलवा मी घाबरत नाही असे म्हणत पोलिसांचे वाहन अडविले. तिचा अवतार पाहून पोलीस निघून गेले. सदर महिलेने अशोक चौकात धिंगाणा घातला. छोट्या दुकानात जाऊन सामानाची नासधूस केली. दुकांनात होत असलेले नुकसान पाहून महिलांनी तिची धुलाई केली. काही ठिकाणी तिने दगडफेकही केली. दुकानांत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर नगरपालिकेची रुग्णवाहिका, पोलिस वाहन आले. महिला पोलिस कर्मचार्‍यांनी तिला रुग्णवाहिकेत बसवले. नंतर तिची रवानगी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. सदर महिला कोण? कोठे मद्यपान केले याबाबत माहिती मिळाली नाही.

Web Title: Radha of a drunken woman for two hours in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here