Home अहमदनगर आधी सत्तेतून बाहेर पडा मगच अयोध्येची वाट धरा. ना. विखे पाटील

आधी सत्तेतून बाहेर पडा मगच अयोध्येची वाट धरा. ना. विखे पाटील

आधी सत्तेतून बाहेर पडा मगच अयोध्येची वाट धरा. ना. विखे पाटील

शिर्डी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दात समाचार घेतला असून, अगोदर या दळभद्री सरकार मधून बाहेर पडा मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा असे शिवसेनेला सुनावले आहे.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

कोंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची फैजपुर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. या विशाल सभेला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍यावर बोलताना ते म्हणाले की शिवसेनेने आजवर 235 वेळा सरकारमधून बाहेर पाडण्याचे इशारे दिले पण शेवटपर्यन्त सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकनविरोधी आहे. शेतकरी विरोधी असे वाटत असेल तर शिवसेनेने तत्काळ या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे असे आवाहन विरोधी पक्षनेते विखे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. भाजप शिवसेना सरकारने गांधी जयंतीला महात्मा गांधी प्रती दाखवलेल्या खोट्या कळवळेचा धागा धरून विखे पाटील म्हणाले की हे सरकार गांधीजींचे नाव घेते पण प्रत्यक्षात त्यांनी गांधीजींच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम त्यांनी केले आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची द्विसूत्रि दिली पण हे सरकार खरे कधी बोलत नाही आणि खोटे बोलण्यात यांचा हात कोणही धरू शकत नाही. 100 गोबेल्स मेले असतील तेव्हा भारतीय जनता पक्ष जन्माला आला असेल अशी बोचरी टीका ही त्यांनी केली. या सरकारकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here