Home अकोले भंडारदरा:पाण्याच्या हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू

भंडारदरा:पाण्याच्या हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू

भंडारदरा:पाण्याच्या हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू

भंडारदरा: अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील तीन वर्षाच्या चिमुकल्या आयानचा पाण्यात हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

याबबत सविस्तर माहिती अशी कि भंडारदरा येथील रहिवाशी असलेल्या अन्सार कादर मणियार या खासगी वाहन चालकाचा एकुलता एक तीन वर्षाचा मुलगा आयान नेहमीप्रमाणे शिक्षक कॉलनीत आपल्या राहत्या घराच्या समोर सायंकाळी खेळत होता. खेळताना थोड्या वेळाने तो अचानक दिसेनासा झाला म्हणून त्याची शोधाशोध सुरु झाली परंतु तो कुठेही दिसून आला नाही. तोपर्यंत अंधार पसरला होता. शोधाशोध करूनही सापडत नसल्याने गल्लीत एकच गोंधळ उडाला होता. त्याचे मोठे चुलते चांद मणियार यांनी शेजारी नवीन काम झालेल्या घराच्या उघड्या पाणी भरलेल्या हौदात डोकावले असता त्यांना आयान पाण्यात दिसला. त्याला बाहेर काढून तत्काळ शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला . मात्र तोपर्यत चिमुकल्या आयानने जगाचा निरोप घेतला होता. हि वार्ता वाऱ्यासारखी गावभर पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here