Home अहमदनगर शेतजमिनीच्या वादातून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

शेतजमिनीच्या वादातून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Rahata One killed in a land dispute

राहता | Rahata: तिसगाव प्रवरा येथील एका तरुणास लोहगाव हद्दीत शेतजमिनीच्या वादातून डोक्यात टणक हत्यार मारल्याने गंभीर जखमी झाला.  यानंतर शनिवारी त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

गौरव अनिल कडू रा. तिसगाव प्रवरा असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलिसानी  अमोल दिलीप नेहे, वसंत लहानू नेहे, किशोर लहानू नेहे, सुरेश लहानू नेहे, सचिन वसंत नेहे, किशोर लहानू नेहे सर्व रा. लोहगाव या पाच जणांना अटक केली आहे.

लोहगाव हद्दीत गट नंबर ६० या शेतजमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे. गौरव आणि त्याचा भाऊ ३१ डिसेंबरला चार आणण्यासाठी गेले असता हे पाच जण कडू यांच्या शेतात नांगरणी करीत असल्याचे त्यांना दिसले. गौरव व त्याचा भाऊ यांनी हे पाहिले असता त्यांनी त्यांना जाब विचारला. यामुळे आरोपीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनतर या पाच जणांनी गौरव व किशोर यांस लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गौरव हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांना न्यायालायात हजर केले जाणार आहे.   

Web Title: Rahata One killed in a land dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here