Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी ९ करोनाबाधित
Sangamner City Six and Rural area Three Corona Positive
संगमनेर | Sangamner: शनिवारी प्राप्त झालेले अहवाल सर्व खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले आहेत. संगमनेर तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात ९ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील सहा जणांचा तर ग्रामीण भागातील तीन जणांचा समावेश आहे.
शहरात शिवाजीनगर येथे ३२ वर्षीय महिला, मालपाणी नगर येथे ६९ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, चैतन्य कॉलनी येथे ४९ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे ८१ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून पोखरी हवेली येथे ५० वर्षीय महिला, घुलेवाडी येथे ६९ वर्षीय महिला, निमोण येथे ५० वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 9 Corona Updates reports