Home अहमदनगर साकुरीत भर दुपारी घराचे कुलूप तोडून 72 हजारांचा ऐवज चोरी

साकुरीत भर दुपारी घराचे कुलूप तोडून 72 हजारांचा ऐवज चोरी

साकुरीत भर दुपारी घराचे कुलूप तोडून 72 हजारांचा ऐवज चोरी

राहता: राहता तालुक्यातील साकुरी येथे महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भर दुपारी घराचे कुलूप तोडून 72 हजार रुपये लंपास केल्याची घटना 21 सप्टे. रोजी घडली आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

याबाबत राहता पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन रामभाऊ गुडे (रा. साकुरी) यांच्या फिर्यादीनुसार गेल्या नऊ महिन्यापासून साकुरीतील इंदिरनगर येथे गुडे भाडोत्री खोलीत पत्नी व दोन मुलांसह राहतात. नेहमीप्रमाणे  मदन रामभाऊ गुडे हे सकाळी शिर्डी येथे कामावर गेले होते. पत्नी दुपारी पावणे बाराच्या सुमारास घराला कुलूप लावून मुलांना शाळेत सोडवायला गेली होती त्याच दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले 49 हजार 500 रु. 23 हजार रु. किमतीचे दागिने असा एकूण 72 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरी केला. या घटनेचा पुढील तपास शरद गायमुखे करत आहेत.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here