फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकांनी केला एकावर गुन्हा दाखल
Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्या घरातून अपहरण (Abduction) केल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 14 मे रोजी मुलगी बेपत्ता झाली आहे. आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी कोंढवड येथील अमोल शंकर माळवदे याच्यावर अपहरणचा (Abduction) गुन्हा दाखल केला आहे.
अपहरण झालेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आई वडिलांसह राहुरी तालुक्यातील पुर्व भागात राहते. ती राहत्या घरातून 14 मे रोजी साडे बारा ते साडे पाच वाजे दरम्यान बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तीला अज्ञात कारणासाठी फूस लावून अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे.
त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल शंकर माळवदे, राहणार कोंढवड, ता. राहुरी. याच्या विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.
Web Title: Rahuri Abduction of a minor girl by seduction