Home Maharashtra News Rape | धक्कादायक! विवाहितेवर दिवसा चाकूचा धाक दाखवून बलात्कार, दोघा भावांना अटक

Rape | धक्कादायक! विवाहितेवर दिवसा चाकूचा धाक दाखवून बलात्कार, दोघा भावांना अटक

Rape of a married woman by stabbing her during the day

मुंबई: धारावीतून बलात्काराची (Rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉल मधूनच दोघांत संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री वाढली. मैत्रीतून प्रेमाच्या भावनेतून आलेल्या मिस कॉलला ग्रीन सिग्नल समजून तरुणाने भावासोबत विवाहितेचे घर गाठले. पण तिने गैरसमज झाल्याचे सांगून जाण्यास सांगितले.

तेव्हा तरुणाने चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला व त्याच्या भावाने बलात्काराचे चित्रीकरण केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जवळपास २०० हून अधिक सीसीटीव्ही तपासत अटक करण्याची मागणी केली. अनिल चव्हाण आणि निलेश चव्हाण रा. विलेपार्ले येथील रहिवासी आहेत.

तक्रारदार १९ वर्षीय तरुणी धारावी परिसरात सासरच्या मंडळीसोबत राहत आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास चव्हाण भावांनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. एकाने चित्रीकरण केले. आरोपींनीओळख लपविण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले.

Web Title: Rape of a married woman by stabbing her during the day

Previous articleसोमनाथ निवृत्ती गिते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
Next articleफूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकांनी केला एकावर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here