Home अहमदनगर अहमदनगर: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

अहमदनगर: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

Rahuri Crime Municipal council employee beaten for not paying for alcohol

Ahmednagar | Rahuri Crime | राहुरी: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास सोमनाथ मोरे या तरुणास तिघाजणांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. दि. 20 फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीत ही घटना घडली.

याबाबत सोमनाथ मोरे याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून योगेश बाचकर, सनी बाचकर, पप्पू बाचकर तिघे रा. बारागाव नांदूर गावठाण, ता. राहुरी या तिघांवर मारहाणीचा व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमनाथ अर्जुन मोरे हा तरुण राहुरी नगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागात काम करतो.  दि. 20 फेब्रुवारी रोजी राहुरी शहरहद्दीतील बाजार समितीमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ त्याची ड्युटी होती. ड्युटी संपल्यावर तो घरी निघून गेला होता. त्यावेळी त्याचे जर्किन तेथे विसरून राहिले. रात्री साडेदहा वाजे दरम्यान सोमनाथ मोरे हा त्याचे जर्किन घेण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेला. त्यावेळी तेथे योगेश बाचकर हा आला आणि मोरे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. यावेळी मोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला.. याचाच राग आल्याने त्याने व त्याच्याबरोबर असलेल्या इतर दोघांनी मोरे याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच गोणी उचलायच्या हूकाने सोमनाथ याच्या गळ्यावर मारून त्याला जखमी केले.

वाचा: Ahmednagar News

सोमनाथ मोरे याच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: Rahuri Crime Municipal council employee beaten for not paying for alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here