धक्कादायक! २१ वर्षीय मामीकडून अल्पवयीन भाच्याचा लैंगिक छळ
Nagpur Crime | नागपूर: नागपुरमध्ये मामी भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual harassment ) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या महिलेने लैंगिक छळ करतानाचा व्हिडीओ काढून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अशाप्रकारचा छळ केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे हि घटना घडली आहे.. या प्रकरणातील आरोपी मामीचं वय हे २१ वर्षीय आहे. तर पीडित भाचा हा १६ वर्षीय आहे. या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध पारशिवनी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या महिलेने भाच्याचा लैंगिक छळ करुन त्याचे व्हिडीओ शूटींग केलं. त्यानंतर ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेने वारंवार भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने घरामध्ये कोणीही नसताना या मुलावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये काढून ठेवला. त्यानंतर हे व्हिडीओ दाखवून ही महिला आपल्या भाच्याला धमकी देत लैंगिक शोषण केलं. या प्रकरणामध्ये आता पोलीस अधिक तपास करत असून लैंगिक छळाबरोबरच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment ) केल्याप्रकरणीचा गुन्हा या महिलेविरोधात दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Nagpur Crime Sexual harassment of a minor niece by a 21-year-old aunt