Home अकोले ग्रामसभा विशेष मतदान: राजूर विहिरीबाबत याबाजुने बहुमत

ग्रामसभा विशेष मतदान: राजूर विहिरीबाबत याबाजुने बहुमत

Rajur Gram Sabha Special Voting Majority in favor of

Rajur News | राजूर (विलास तुपे): अकोले तालुक्यातील राजूर येथे महादेव मंदिर चौकातील विहीर  2011 साली तत्कालीन सरपंच व पदाधिकारी यांनी सर्वानुमते बुजविण्याचा निर्णय घेतला  होता. मात्र तब्बल 11 वर्षांनी बुजविलेली विहीर पुन्हा सुरू करावी असा विषय 26 जानेवारी 2022 झालेल्या ग्रामसभेत आला होता.  त्यामुळे सदर विषयावर मोठा गदारोळ झाल्यानंतर सर्वानुमते विशेष ग्रामसभा घेऊन मतदान घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आज मंगळवारी ग्रामसभेत गुप्त मतदान घेण्यात आले. यात  विहिर उकरण्यात यावी याबाजूने बहुमत मिळाले आहे. त्यामुळे लवकरच ही विहिर पुन्हा उकरण्यात येणार आहे.

पूर्वी पाण्याचे मुख्य स्रोत असलेले महादेव मंदिराजवळ ही विहिर संपूर्ण राजुर गावची तहान भागवत होती. मात्र कालांतराने तिचा वापर कमी झाल्याने तात्काळ  ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सदर विहीर बुजविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सध्या नळ पाणीपुरवठ्याची मोटर जळल्यास राजुरचा पाणीप्रश्‍न गंभीर होतो. पाण्याची इतर स्रोत उपलब्ध नसल्याने राजूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे घमंडी विहीर  पुन्हा उकरली जावी यासाठी  ग्रामसभेत प्रश्‍न उपस्थित केल्याने मोठा गदारोळ झाला होता. दोन गटात मतभिन्नता असल्याने हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेण्याचे ठरविले. त्यातूनच मतदान घेण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार आज मंगळवारी चिठ्ठी टाकून गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. या विषयासाठी एकूण 516 ग्रामस्थांनी मतदान केले. यात विहिर उकरण्याच्या बाजून 265 मतदान झाले. तर विरोधात 198 मतदान झाले.  तर 53 मते बाद झाले. या अनोख्या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते.

Web Title: Rajur Gram Sabha Special Voting Majority in favor of

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here