Home राहुरी कर्जबाजारीपणाला कंटाळून पित्याने चिमुकलीचा खून करत स्वतः केली आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून पित्याने चिमुकलीचा खून करत स्वतः केली आत्महत्या

Rahuri father killed Chimukali and committed suicide

राहुरी Rahuri: राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी मध्यरात्री  स्वतः च्या तीन वर्षीय मुलीचा तोंड दाबून खून करून स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

मागील काही दिवसांपासून त्याची पत्नी दुसरी मुलगी झाल्याने बाळंतपणासाठी माहेरी गेली होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे वय ४७ याने गुरुवारी रात्री ११ वाजेनंतर स्वतः च्या तीन वर्षाच्या अदिरा पळंदे हिच्या तोंडावर उशी दाबून तिचा जागीच खून केला. त्यानंतर अनिल याने घराच्या छताला नायालान दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी चौकशी केली असता अनिल यांच्यावर सहकारी संस्थांचे कर्ज होते. अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली होती. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे पिके कशी उभी करायची या विवंचनेतून त्याने गुरुवारी रात्री स्वतः च्या मुलीचे व स्वतः ची जीवनयात्रा संपविली.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Rahuri father killed Chimukali and committed suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here