Home संगमनेर संगमनेर: बँक खात्यातून ४० हजार परस्पर लंपास, सायबर सेलकडे लेखी तक्रार

संगमनेर: बँक खात्यातून ४० हजार परस्पर लंपास, सायबर सेलकडे लेखी तक्रार

Sangamner 40,000 rs theft from a bank account

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शशिकांत नामदेव गुंजाळ यांच्या इंडियन ओवरसीज बँक शाखेतील बचत खात्यातून दोन दिवसांत ४० हजार लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. शशिकांत गुंजाळ याने अहमदनगर येथील सायबर सेल पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शशिकांत नामदेव गुंजाळ हे तळेगाव दिघे येथील रहिवासी आहेत. त्यांचे इंडियन ओवरसीज बँक मध्ये बचत खाते आहे. या बचत खात्यातून २४ ऑक्टोबर २०२० रोजी १० हजार रुपये व २६ ऑक्टोबर २०२० रोजी तीन वेळा १० हजार रुपये असे ४० हजार रुपये परस्पर लंपास केले गेले आहे. याप्रकरणीशशिकांत गुंजाळ यांनी बँक व अहमदनगर सायबर सेल यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

बँकेच्या प्राथमिक माहितीनुसार सदर व्यवहार मध्यप्रदेश मधील सिंघरुनी येथून करण्यात आला आहे. यस बँक बीसीकडून आधार क्रमांकाद्वारे ही रक्कम काढण्यात आल्याचे इंडियन ओवरसीज बँक व्यवस्थापनाने सांगितले आहे. याप्रकरणी इंडियन ओवरसीज बँक च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व अहमदनगर सायबर सेल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे असे सांगितले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner 40,000 rs theft from a bank account

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here