नवऱ्याने बायकोच्या डोक्यात लाकडी दांडके टाकुन ठार मारले
राहुरी | Rahuri: तालुक्यात देवळाला परिसरात खळबळजनक प्रकार घडला आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात नवऱ्याने तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून तिला ठार मारल्याची घटना घडली आहे. ही घटना काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मयत शीतल बोलवड वय ३५, रा, आंबी स्टोअर देवळाली प्रवरा या महिलेचे नातवाईक विजय एकनाथ बर्डे यांनी आरोपी नवरा बाबासाहेब विठ्ठल बोलवड याच्याविरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब बोलवड याने त्याच्या पत्नीकडे शीतल बाबासाहेब बोलवडे हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग अनावर झाल्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, कपाळावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा जीव गेला.
या घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, डीवायएसपी डो. राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.
हा आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बागुल हे करीत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Rahuri husband killed his wife by throwing a wooden