पोहण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत बुडाला, शोध कार्य सुरु
शिर्डी | Shirdi: शिर्डी शहरातील कालिकानगर येथे एक तरुण शनिवारी दुपारी विहिरीत पोहण्यासाठी गेला असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
सुरज जाधव असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय १५ वर्ष आहे. सुरज हा शनिवारी दुपारी कालिकानगर येथील एका विहिरीवर पोहोण्याच्या हेतूने त्याने विहिरीत उडी मारली. परंतु त्यास पाण्याचा अंदाज न आल्याने विहिरीत बुडत असताना जवळ असलेल्या तरुणांनी पाहिले.
ही विहीर साधारणतः ७० फुट असल्याची माहिती समोर आली आहे. सुरज याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. सुरजचा शोध घेण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीची बंबा व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Shirdi young man who went for a swim drowned in a well