Home राहुरी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीनेच केला पत्नीचा खून

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीनेच केला पत्नीचा खून

Rahuri husband killed his wife

राहुरी | Rahuri : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीनेच पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी उघडकीस आणली आहे. तालुक्यातील कुक्कडवेढे येथे ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे असलेल्या कुक्कडवेढे येथे गंगाबाई बद्री चव्हाण ही व तिचा मुलगा व पती उस तोडणीसाठी आले होते. ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी आहेत. ऊस तोडणी कामगार म्हणून ते कुक्कडवेढे येथे काम करण्यास आले होते. आरोपी पति बद्री चव्हाण हा व्यसनाधीन होता. २ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने पत्नीकडे पैशाची मागणी केली. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिल्याने याचा मनात राग आल्याने दोघांमध्ये भांडण झाले. बद्री चव्हाण याने पत्नीला घराबाहेर ओढत नेले. आणि तिच्या डोक्यात दगड मारला. अशी माहिती गंगाबाईच्या मुलाने दिली आहे.

कुक्कडवेढे परिसरात उजव्या कालव्याच्या बाजूला ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ऊस तोडणी महिलेला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके व आयपीएस अधिकारी, राहुरी पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उतरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. आरोपी बद्री चव्हाण याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Rahuri husband killed his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here