संगमनेर शहरात 6 तर ग्रामीण भागात 22 करोना पॉझिटिव्ह
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात 24 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, यामध्ये शहरातील सहा तर ग्रामीण भागातील बावीस जणांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 4 हजार 367 इतकी झाली आहे.
प्राप्त झालेल्या अहवालात शहरात शिवाजीनगर येथे 16 वर्षीय मुलगा, मारवाडी गल्ली येथे 75 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे 47 वर्षीय पुरुष, अकोले रोड येथे 48 वर्षीय पुरुष, बडोदा बँक कॉलनी येथे 62 वर्षीय पुरुष, पंचायत समिती नजीक 56 वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
तसेच ग्रामीण भागातून घुलेवाडी येथे 64, 59,50 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय तरुण, 52, 34,30 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालिका व ९ वर्षीय बालक, पिंपरणे येथे 20 वर्षीय तरुण, 19 वर्षीय तरुणी, निमगाव टेंभी येथे २ वर्षीय बालक, राजापूर येथे 70 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथे 45 वर्षीय महिला, जोर्वे येथे 30,22 वर्षीय पुरुष, साकुर येथे 51 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे 52 वर्षीय महिला, चंदनापुरी येथे 57 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 64 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Corona update news 3 Nov