Home अहमदनगर बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Rahuri Missing girl Dead body Found

Ahmednagar | Rahuri | राहुरी: गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह (Girl Dead Body) आढळून आल्याने देवळाली प्रवरा येथे एकच खळबळ उडाली आहे. देवळाली प्रवरा  येथील त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह देवळालीतील शनिमंदिरालगतच्या  बारवेत आढळून आला आहे. त्या मृतदेहाची ओळख पटल्यावर तिच्या आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडला आहे.

त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणावर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्या तरूणीने आत्महत्या केली की तिचा कोणी घातपात केला? याबाबत शंका उपस्थित होत आहे. वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे.

गुरूवारी दुपारी तिचा मृतदेह बारवेत आढळून आला. घटनास्थळी सपोनि. निरज बोकील यांनी जाऊन पाहणी केली असुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Web Title: Rahuri Missing girl Dead body Found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here