Murder: दगड डोक्यात घालून तरुणीचा खून
राहुरी: राहुरी फॅक्टरी परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी परिसरातगुंजाळ नाक्याजवळ देशमुख गीते वस्तीच्या रस्त्यावर तरुणीचा मृतदेह पडलेला आढळून आला.
स्थानिक शेतकरी विशाल गीते हे कोंबडी खाद्याचे वाहन येणार असल्याने दुचाकीवरून जात असताना दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला.त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक हजार झाले. सकाळी नगरवरून फोरेन्सिक पथक व ठसे तज्ञ व पोलीस पथक हजर झाले. घटनास्थळी आढळून आलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारील दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले.
तरुणीच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून नारंगी रंगाचा सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर इंगर्जी अक्षरात शीतल व डाव्या अंगठ्याच्या हाताखाली एसपी असे गोंदलेले आहे. परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नसून मृताची ओळख पटविण्याची प्रयत्न केला गेला. वाहनातून तरुणीला आणून खून केला असल्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही धागे दोरे अजून हाती आले नाही. अज्ञात व्यक्तीविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Rahuri Murder of a young woman by throwing a stone