Home क्राईम संगमनेर: भांडणातून महिलेला जावेने व चुलत सासूने पेटविले

संगमनेर: भांडणातून महिलेला जावेने व चुलत सासूने पेटविले

Sangamner Crime woman was set on fire by her cousin and mother-in-law 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील मनोली या गावात सरपण तोडण्याच्या वादातून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने व चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

आपल्या घरासमोरील सरपण तोडत असलेल्या भावकीतील महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेच्या मदतीला मुले आल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र ती ६० टक्के भाजली आहे.

याप्रकरणी पेटवून देणाऱ्या दोन महिलासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना सदाशिव शिंदे रा. मनोली खंडोबा मंदिराजवळ वय २४ असे या महिलेला पेटवून देण्यात आले. आकांक्षा शंकर शिंदे व हरणबाई नाना शिंदे या तिला पेटवून देणाऱ्या महिला तसेच फोनवरून शिवीगाळ करणाऱ्या शंकर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आकांक्षा शिंदे ही अर्चनाची जाव, आरोपी हरणबाई शिंदे अर्चनाची चुलत सासू, शंकर शिंदे दीर आहे.

अर्चना घराजवळच असणाऱ्या खंडोबा मंदिराजवळ सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जाऊ आकांक्षा हिने ते आमचे सरपण असून घेऊ नको, असे धमकावले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. आकांक्षाने पती शंकर यास फोन लावून दिला.त्यावेळी अर्चनाला शिव्या देण्यात आल्या. तो परभणीत होता. सरपण हवे असेल तर पैसे दे असा भांडणाचा संवाद सुरु होता. अर्चना ऐकत नसल्याचे लक्षात आल्यावर आकांक्षाने फोन कट करत मारहाण करण्यास सुरुवात केली. कुऱ्हाडीच्या दांड्याने अर्चनाला मारहाण केली. या दोघींमधील तुंबळ हाणामारी पाहून चुलत सासू हरणबाई तेथे आली. हिची कायमची कटकट मिटवून टाक असे म्हणत अर्चनाचे हात धरले. आकांक्षाने घरातून डिझेलचा डबा व काडीपेटी आणली. रागातून अंगावर डीझेल ओतून पेटवून देण्यात आले. कपड्यांनी पेट घेतल्याने अर्चनाने आरडाओरडा केला त्यावेळी तिची मुले व अन्य ग्रामस्थ मदतीला धावून येथ पाणी आणून आग विझविली. अर्चनाचे पती यांना बोलाविण्यात आले आणि अर्चना यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Web Title: Sangamner Crime woman was set on fire by her cousin and mother-in-law 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here