Home अहमदनगर हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

Rahuri Police raid on high profile prostitution business

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील चिचोली फाटा येथील हॉटेल नंदादीपमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. तर हॉटेल चालक सुनील रामचंद्र हारदे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुनील रामचंद्र हारदे हा हॉटेल नंदादीप मध्ये वेश्या व्यवसाय चालवत होता. याबाबत पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती  मिळाली. नंतर या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Ahmednagar Breaking Rahuri Police raid on high profile prostitution business

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here