Home अकोले नीट रहा नाहीतर गोळ्या घालीन: डॉ.अजित नवले यांना जीवे मारण्याची धमकी

नीट रहा नाहीतर गोळ्या घालीन: डॉ.अजित नवले यांना जीवे मारण्याची धमकी

Akole Threat to kill Dr. Ajit Navale

अकोले | Akole: मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना नीट रहा नाहीतर गोळ्या घालीन अशी गुरुवारी एका व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.  

या कृत्याचा माकप महाराष्ट्र राज्य कमिटीने निषेध केला आहे. अजित नवले यांच्याबाबत फेसबुकवर जीवे मारण्याची धमकीची पोस्ट लिहिली असून ही पोस्ट इतर दोघांनी लाईक केली आहे.

सध्या देशभर केंद्र सरकार विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर ही धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे. याबाबत अजित नवले व किसान सभा यांच्याकडून पोलिसांत कोणतेही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. याबाबत पोलिसांना तोंडी माहिती देण्यात आली आहे. अशा धमक्यांना घाबरून चालणार नाही तर विवेकी विचार घेऊन शेतकरी प्रश्नांसाठी लढा सुरु राहील असे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Akole Threat to kill Dr. Ajit Navale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here