संगमनेर तालुक्यातील घटना : मुरूम तस्कराने महसूल कर्मचाऱ्यास केली धक्काबुक्की
संगमनेर | Sangamner: विना परवाना मुरूम वाहतूक करणाऱ्या एकाने महसूल कर्मचारी यास धक्काबुक्की व शिवीगाळ करून ट्रक्टर घेऊन पळून जाण्याची घटना घडली आहे.
ही घटना संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशियीत आरोपी शरद नाना हासे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील रस्त्यावरून एक मुरूम भरलेला ट्रक्टर भरधाव वेगाने जात होता. यावेळी महसूल कर्मचारी उमेश विठ्ठल देवगडे यांनी चालकास थांबवले. यावेळी हा ट्रक्टर मुरुमाने भरलेला आढळून आला. देवगडे यांनी वाहतुकीचा परवाना आहे का? असा प्रश्न केला असता त्या व्यक्तीने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. ट्रक्टर तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले असता ट्रक्टर घेऊन पळून गेला.
याबाबत देवगडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शहर पोलिसांनी संशियीत आरोपी शरद नाना हासे रा. राजापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Web Title: Sangamner pimple smuggler pushed the revenue staff