Home क्राईम कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थिनीवर बलात्कार व धमकी

कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थिनीवर बलात्कार व धमकी

Rahuri Rape and intimidation of students

राहुरी | Rahuri: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  राहुरी फॅक्टरी परिसरात रहिवासी असणारी एक महाविद्यालयात शिकत असलेली २७ वर्षाची तरुणी हिला गेट टूगेदर या कार्यक्रमासाठी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

आरोपी विनायक राजेश तडसे रा. नवी मुंबई या तरुणाने सेक्टर नम ९, बिल्डींग नं १२ नवी मुंबई येथे गेट टूगेदर या कार्यक्रमासाठी बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व त्या तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढून सदर प्रकार कोणाला सांगितलास तर नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच विनायक तडसे याने वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

विनायक राजेश तडसे याच्या घरात तसेच अलिबाग येथे अत्याचाराचा प्रकार घडला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात काल या विद्यार्थिनीने फिर्याद दिली असून विनायक तडसे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Rahuri Rape and intimidation of students

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here