Home Accident News Accident: कार आणि दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

Accident: कार आणि दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

Rahuri station Road Accident one death  

राहुरी | Accident: राहुरी स्टेशन रोडवर एक चारचाकी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात  एक ठार तर एक अत्यवस्थ जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

राहुरी स्टेशन रोडवर पेट्रोल पंपासमोर साडेचार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला.. मानोरी गावातील एम.एच 01 डि.के.0904 या स्वीट डिझायर आणि सीटी 100 या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.

या अपघातात मानोरी येथील दुचाकीस्वार अजमतखा पठाण (वय 60) हे ठार झाले तर त्यांची पत्नी हलीमा अजमतखा पठाण, वय 53 या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अहमदनगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Rahuri station Road Accident one death  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here