Home Accident News Accident संगमनेर: मालवाहू ट्रक व कंटेनरचा अपघात

Accident संगमनेर: मालवाहू ट्रक व कंटेनरचा अपघात

Sangamner Talegaon Accident truck and Container 

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळजवळील ओढ्यात असलेल्या पुलादरम्यान अपघाती वळणावर मालवाहू ट्रक व कंटेनरची धडक होऊन अपघात घडला. या अपघातात तिघे जण वाचले आहे. लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे येथे घडली.

अरुंद रस्ता व पूल यामुळे अपघात सत्र सुरूच आहे. या महामार्गाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त आहे.

लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने नाशिककडून नगरच्या दिशेने चालक अंकित राजभर हा मालवाहू कंटेनरमधून इलेक्ट्रोनिक साहित्य घेऊन जात असताना नगरहून नाशिकच्या दिशेने रिकामा मालट्रक जात होता. ट्रक व कंटेनरची तळेगाव दिघे बाजारतळनजीक पुलादरम्यान पश्चिमेस बाजूस अपघाती वळणावर धडक होत अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या कडेला पुलाच्या साईड गटारात अडकला. अपघातातून कंटेनर चालक अंकित राजधर व अन्सूल राजधर रा. उत्तरप्रदेश व मालवाहू ट्रक चालक असे तिघे जण बचावले.

Web Title: Sangamner Talegaon Accident truck and Container 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here