Home अहमदनगर Theft: फिर्यादीनेच केला चोरीचा बनाव, तोच निघाला चोर

Theft: फिर्यादीनेच केला चोरीचा बनाव, तोच निघाला चोर

Rahuri The plaintiff made the theft

राहुरी | Theft: रस्त्याने जात असताना कापुराई देवी फाटा येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी वाहन अडवून  खाली उतरवून मारहाण केली. धारदार शस्त्राने जखमी केले. खिशातील रोकड काढून नेली अशी फिर्याद त्याने पोलीस ठाण्यात दिली. मात्र स्वतःच्या वक्तव्यावर ठाम न राहिल्याने पोलिसी खाक्या दाखवताच पोपटा सारखा बोलू लागला.

नितीन भास्कर अंत्रे (वय २८, रा. अनापवाडी) असे आरोपीचे नाव आहे. अनाप याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की २९ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आपण राहुरी-अनापवाडी रस्त्याने जात असताना कापुराई देवी फाटा येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी वाहन अडविले. खाली उतरवून मारहाण केली. धारदार शस्त्राने जखमी केले. खिशातील ३२ हजार २३० रुपये व आधार कार्डची कलर झेरॉक्स काढून नेली.

याप्रकरणी चालकाने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, पोलिसांना फिर्यादीच्या वागण्यात विसंगती असल्याचे आढळून आल्याने त्यांस संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने लुटीचा बनाव केला असल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Rahuri The plaintiff made the theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here