Home Accident News नाशिक पुणे महामार्गावर साकुर फाट्यानजीक उसाचा ट्रॅक्टरला दोन टेम्पोने धडक दिल्याने अपघात

नाशिक पुणे महामार्गावर साकुर फाट्यानजीक उसाचा ट्रॅक्टरला दोन टेम्पोने धडक दिल्याने अपघात

Sangamner Accident when a sugarcane tractor was hit by two tempos 

संगमनेर | Accident: नाशिक पुणे महामार्गावर साकुर फाट्यानजीक उसाचा ट्रॅक्टरला दोन टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला.

साकुर फाट्यानजीक अपघात झाल्याने पुणे नाशिक महामार्गावरील सर्व वाहने जुन्या चंदनापुरी घाट रस्त्याने वळविण्यात आली. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे उस सर्वत्र रस्त्यावर पडलेला दिसून आला. या अपघाताच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून बुधवारी दुपारी माहिती देण्यात आली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ट्रॅक्टरसह दोन टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी या अपघाताच्या घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान नाशिक पुणे महामार्गावर सातत्याने अपघात होत आहे. दिवसेंदिवसया महामार्गावर अपघातांच्या घटनांची वाढ होत आहे.

Web Title: Sangamner Accident when a sugarcane tractor was hit by two tempos 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here