Home Accident News Accident: चार वाहनांच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, १० जण जखमी

Accident: चार वाहनांच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, १० जण जखमी

Rahuri Three people were killed on the spot in a horrific accident 

राहुरी |Accident| Rahuri: नगर-मनमाड महामार्गावर गुहा गावाजवळील  गुहापाटाच्या पुढे चार वाहनांच्या भीषण अपघातात (Accident) तीन जण जागीच झाल्याची घटना घडली आहे. या ठार  झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. एकेरी वाहतुकीमुळे समोरासमोर झालेल्या या अपघातात काल गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.  या अपघातात दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिर्डीहून शिंगणापूरकडे साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेपट्ट्याने चालणारी क्रूजर (क्रमांक- एमएच 20 इजी 1402) व नगरहून मनमाडकडे जाणार्‍या कंटेनर (क्रमांक एचआर 45 बी 4470) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये दोन दुचाकीही सापडल्या. क्रुझरमध्ये महिला भाविक प्रवास करत होत्या. अपघात इतका भीषण होता की क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला आहे.

या महामार्गाचे सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक चालू होती. कंत्राटदाराने कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाही. रात्री चालकांसाठी रेडियम पट्टी लावलेल्या नाही. त्यामुळेच हा अपघात (Accident) झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर चालक पसार झाला.

या अपघातात एक दुचाकीस्वार दोन्हीही गाड्यांमध्ये सापडल्यामुळे त्याने आपला जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरून उडी मारली. त्यामुळे फक्त पायाच्या दुखापतीवर निभावले आहे. अपघाताची खबर मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अपघातातील जखमींची संपूर्ण माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Rahuri Three people were killed on the spot in a horrific accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here