Home अहमदनगर Rape: गरोदर महिलेवर बलात्कार, शारीरिक संबंधाचा व्हिडियो

Rape: गरोदर महिलेवर बलात्कार, शारीरिक संबंधाचा व्हिडियो

Rape of a pregnant woman, video of sexual intercourse

जामखेड | Rape Case | Jamkhed: जामखेड तालुक्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गरोदर महिलेला पिण्याचे पाणी मागून ती पाणी आणण्यासाठी घरात गेली असता आरोपीने घराचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्यासोबतच्या शारीरिक संबंधाचा काढलेला व्हिडियो (video of sexual intercourse) व्हायरल करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून विकास अंकुश ढोले रा. वंजारवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे की, वंजारवाडी येथे ९ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका गरोदर महिलेला पिण्याचे पाणी मागितले. पिडीत महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरात गेली असता आरोपी तिच्या पाठीमागून गेला.व घराचा दरवाजा लावून तिच्यासोबत बळजबरी करू लागला. सहा महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले तरीदेखील त्याने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी जामखेड पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Rape of a pregnant woman, video of sexual intercourse

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here