Home क्राईम Theft: संगमनेरात शिक्षकाची कार लांबविली, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह

Theft: संगमनेरात शिक्षकाची कार लांबविली, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह

Sangamner Car theft case

संगमनेर |Theft| Sangamner: पोलीस वसाहतीच्या प्रांगणात लावलेला वाळूचा ट्रॅक्टर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच काल सकाळी राहणे मळा परिसरात कारची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

एका अज्ञात चोरट्याने शहरालगतच्या गुंजाळवाडी येथील राहणे मळा परिसरातील एका शिक्षकाची कार लंपास केली असून ही  घटना काल रात्री घडली. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहणेमळा परिसरात राहणारे शिक्षक विठ्ठल कडुसकर यांच्या स्विफ्ट डिझायर कारची काल सकाळी चोरी (Theft) झाली. याबाबत कडुसकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 702/2021 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत.  संगमनेर शहर पोलीस ठाण्याला मुकुंद देशमुख यांच्या रूपाने कडक पोलीस निरीक्षक लाभलेला असतानाही शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोर्‍या वाढल्या आहेत. पोलीस ठाण्यामध्ये डी.बी अस्तित्वात असतानाही या चोरीचा तपास लावण्यात डीबीच्या कर्मचार्‍यांना अपयश येत आहे. पोलीस अधिकार्‍यांचा वचक नसल्याचे वाढत्या चोर्‍यांवरून दिसत आहे.

संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चोर्‍या वाढल्या आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी व वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Sangamner Car theft case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here