Home अहमदनगर मतदान न केल्याने महिलेस मारहाण

मतदान न केल्याने महिलेस मारहाण

 Rahuri Women beaten for not voting

राहुरी | Rahuri: दारूच्या नशेत एकाने विरोधकांना मतदान केल्याच्या रागातून विवाहित महिलेला शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे घडली आहे.

याबाबत महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रमोद प्रल्हाद कोबरणे, संदीप पोपट कोबरणे दोघेही रा, ओहोळ वस्ती, गणेगाव यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद व संदीप हे दोघे दारू पिऊन घरी आले. घरासमोर उभ्या असलेल्या सासूबाईस तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत मला मतदान का केले नाही. त्यावर आपण त्यांना आम्ही कोणालाही मतदान करतो आमचा अधिकार आहे. असे म्हणाल्याचा राग धरून धमकी दिली. यामुळे राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rahuri Women beaten for not voting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here