Home अहमदनगर अटक टाळण्यासाठी आरोपी रुग्णालयात दाखल झाला अन झाले असे काही

अटक टाळण्यासाठी आरोपी रुग्णालयात दाखल झाला अन झाले असे काही

Ahmednagar accused was admitted to the hospital to avoid arrest

अहमदनगर: खुनाच्या घटनेतील आरोपी अटकेपासून सुटका मिळविण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला, मात्र पोलिसांना सुगावा लागताच तिथे जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथील हॉस्पिटलमध्ये आश्रय घेतला होता.

खुनासह अन्य गुन्हे करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसानी कारवाई केली.या टोळीतील आरोपी पोलिसांच्या हाती येत नाही. अखेर त्याने सुपा येथील एका खासगी रुग्णालयात आरोपी दाखल झाला होता. पोलिसांनी तिथे जाऊन त्यास ताब्यात घेतले आहे. जिल्हा रुग्णालयात त्याला आणून तपासणी केल्यावर त्याचा बनाव उघडकीस आला आहे. त्याला आश्रय देणाऱ्या हॉस्पिटलवर काय कारवाई होणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

सुनील फक्कड आडसुरे वय २६ रा. शेडाळा ता. आष्टी याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी तब्बल सहा महिन्यापासून पसार होता. त्याला शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी सुपा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नगर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खात्री केल्यावर नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मागील एक वर्षापूर्वी वाळकी नगर येथे ओंकार बाबासाहेब भालसिंग याचा खून झाला होता. त्याच्या इतर साथीदार मिळून खून करण्यात आला होता. यातील चार आरोपी अटकेत आहेत. मात्र या टोळीतील हा आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. शेवटी त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Web Title: Ahmednagar accused was admitted to the hospital to avoid arrest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here