Home अहमदनगर तु मला फार आवडतेस असे म्हणत शिक्षिकेचा विनयभंग

तु मला फार आवडतेस असे म्हणत शिक्षिकेचा विनयभंग

Rahuri Women Debauchery 

राहुरी | Rahuri: राहुरी शहरात एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील एका ३० वर्षीय विवाहित असणाऱ्या महिलेचा तिच्या ओळखीच्या एकाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात संतोष धनवडे रा. जोगेश्वरी आखाडा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष धनवडे हा जोगेश्वरी आखाडा येथे राहणारा याने विवाहित शिक्षिकेला तु मला फार आवडतेस असे म्हणत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान या महिला शिक्षिकेच्या फिर्यादीवरून संतोष धनवडे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Web Title: Rahuri Women Debauchery 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here