Home अहमदनगर शेतकऱ्यांची फसवणूक: बियाणे लाल कांद्याचे पिकला मात्र पांढरा कांदा  

शेतकऱ्यांची फसवणूक: बियाणे लाल कांद्याचे पिकला मात्र पांढरा कांदा  

Rahuri onion seeds fraud

राहुरी: शेतकऱ्यांची कांदा बियाणात फसवणूक झाल्याची घटना देवळाली प्रवरा परिसरात उघडकीस आली. राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून एका कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले होते. मात्र हे बियाणे लाल कांद्याऐवजी पांढऱ्या कांद्याचे निघाले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

देवळाली प्रवरा येथील नितीन बबन खांदे, रोहित विठल शेटे या शेतकऱ्यांनी एका कृषी सेवा केंद्रातून २ ऑक्टोबर २०२० रोजी ३५ हजार रुपयांचे लाईट रेड कंपनीचे लाल कांद्याचे बियाणे खरेदी केले होते. कांदा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो पांढरा येऊ लागला. यानंतर शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत तातडीने कृषी सेवा केंद्राशी संपर्क केला. त्यांनी कांदा बियाणे कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी पांढरा कांद्याऐवजी लाल कांदा देण्याचे आश्वासन दिले/ मात्र पुन्हा कंपनीने शेतकऱ्यांना प्रतिसाद न दिल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.  

Web Title: Rahuri onion seeds fraud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here