Home संगमनेर Theft: संगमनेरमध्ये तीन ट्रकमधून ३०० लिटरची चोरी

Theft: संगमनेरमध्ये तीन ट्रकमधून ३०० लिटरची चोरी

Sangamner Theft of 300 liters from three trucks

संगमनेर | Theft : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून ३०० लिटरची चोरी झाल्याची घटना ताजी असतानांच पुन्हा दोन दिवसांनी तळेगाव दिघे गावानजीक एका पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या तीन मालवाहू ट्रकमधून चोरट्यांनी ३०० लिटर डिझेलची चोरी केली आहे. डीझेल चोरीचा हा प्रकार बुधवारी दि. २४ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

तळेगाव दिघे गावानजीक लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर तिरुपती बालाजी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास चालक चांगदेव हरिबा सुर्वे , चालक सोमनाथ सज्जन गिड्डे, चालक दिलदार जब्बार यांनी त्यांच्या ट्रक रात्रीच्या वेळी उभ्या केल्या होत्या. हे चालक व क्लिनर गाडीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर एक ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी तीनही ट्रकच्या इंधन टाक्यांची झाकणे तोडून एका ट्रकमधून १७० ली. दुसऱ्यामधून ९० ली. तर तिसऱ्या ट्रकमधून ५० लिटर डिझेलची चोरी केली. या चोरीसाठी चोरटे चारचाकी वाहन, पाईप व टिलू मोटारीचा वापर करतात.

Web Title: Sangamner Theft of 300 liters from three trucks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here