Rape Case: तरुणाचा विवाहित तरुणीवर अत्याचार
Ahmednagar News Live | Rahuri Crime | राहुरी: राहुरी तालुक्यातील रोहित पवार या तरुणाने पुणे जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सलग आठ महिने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून अत्याचाराबाबत पोलिसांना माहिती दिली.
सदर पिडीत २४ वर्षीय तरुणी ही पुणे जिल्ह्यातील एका गावातील रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी तिची ओळख राहुरी तालुक्यातील रोहित अशोक पवार वय ४ वर्ष रा, वंजुळपोई ता. राहुरी या तरुणाबरोबर झाली. सदर तरुणी ही विवाहित असून तिच्या नवऱ्यापासून तिला एक मुल आहे. आरोपी याने सदर विवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर दिनांक २० एप्रिल २०२१ ते २५ डिसेंबर २०२१ या दरम्यान सदर तरुणीच्या संमतीशिवाय तिच्यावर नगर तालुक्यातील निंबळक बायपास, पुणे येथील हवेली तालुक्यात तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी बलात्कार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी रोहित अशोक पवार याच्या विरोधात बलात्कार (Rape) व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बलात्कार नगर तालुक्यात घडल्याने सदर गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यातून नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
Web Title: Rahuri Young man Rape a married woman