Home संगमनेर संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांवर गुन्हा दाखल

Raid on gambling den in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कुरण येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यामध्ये पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कुरण येथील मोसिन शेख यांच्या कुक्कुटपालन शेडच्या आडोशाला काही लोक तीरट नावाचा जुगार खेळत होते. यासंदर्भातील माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त खबरी मार्फत मिळाली. त्यांनी तातडीने रात्री कुरण येथे पोलीस पथक पाठविले. शहर पोलीस ठाण्यातील उगले, बर्डे, खाडे, सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पाच जण जुगार खेळत होती. मात्र अड्ड्यावर पोलीस आल्याचे लक्षात आल्याने तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या अड्ड्यावर १५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी सुरेश मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार मुनीर कासम शेख, असिफ दादा शेख, बिलाल निसार शेख, गप्फार मोगल शेख, जुम्मा शब्बीर शेख यांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्या अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Raid on gambling den in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here