Home अकोले Raid: अकोले तालुक्यात अवैध दारू विक्री धंद्यांवर छापा

Raid: अकोले तालुक्यात अवैध दारू विक्री धंद्यांवर छापा

Raid Akole Taluka: ७७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Raid on illegal liquor selling businesses in Akole taluka

अकोले: अकोले तालुक्यात तीन ठिकाणी अवैध दारू विक्री धंद्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून कारवाई केली आहे. यामध्ये ७७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

अकोले तालुक्यात अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुक्ल विभागाला मिळाली होती. त्यानुसार दि. 05 ऑगस्ट 2022 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल सह्याद्री, इंदोरीफाटा ता. अकोले, हॉटेल स्नेहभोजन, वीरगाव फाटा ता. अकोले व शाहूनगर अकोले येथे छापे टाकले. या छाप्यात 192.24 ब. ली. अवैध देशीदारू व 3.24 ब. ली. अवैध विदेशी दारू असा एकूण 77 हजार 460 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध दारु विक्री करणार्‍या राजू बबन शिंदे (रा. शाहूनगर, ता. अकोले), विकी ज्ञानदेव रहाणे (रा. अकोले ता. अकोले), भाऊसाहेब बालाजी शिंदे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) या तिघांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, अहमदनगर अधिक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय कोल्हे, निरीक्षक आर. डी. वाजे, निरीक्षक अर्जुन पवार, दुय्यम निरीक्षक संजय बोधे, दुय्यम निरीक्षक एस. एस. ठेंगडे, दुय्यम निरीक्षक व्ही. जी. सूर्यवंशी, एम. डी. कोंडे, डी. वाय. गोलेकर यांनी केली.

Web Title: Raid on illegal liquor selling businesses in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here