Home क्राईम उसतोड कामगार महिलेवर बलात्कार, संसार मोडण्याची धमकी देत अत्याचार

उसतोड कामगार महिलेवर बलात्कार, संसार मोडण्याची धमकी देत अत्याचार

Beed Crime News:  तुझा संसार मोडणार अशी धमकी, वारंवार त्रास देत धमकी देत होता, लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape).

  Ustod worker woman rape

बीड: भंडाऱ्यात एका महिलेवर सामुहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता बीड मध्ये उसतोड कामगार महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आरोपी हा पीडितेला तिचा संसार मोडण्याची धमकी देत होता, अशी तक्रार पीडितेने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुझा संसार मोडणार अशी धमकी आरोपी या महिलेला देत होता. पीडित विवाहित महिला २९ वर्षांची आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती पतीसोबत ऊस तोडणीला गेली होती. त्या ठिकाणी उसतोडणीला आलेला आरोपी राम याच्यासोबत तिची ओळख झाली होती. ऊसतोडणी करून परत आल्यानंतर राम हा वारंवार तिला फोन करत होता.

तिला सतत त्रास देत होता. त्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावर तू माझ्याशी बोलली नाहीस तर, तुझा संसार मोडेन, अशी धमकी तो देत होता. तसेच पीडितेला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. पीडितेने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी रामविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Ustod worker woman rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here