Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या ठिकाणी वेश्या व्यवसायावर छापा, तीन महिलांची सुटका

अहमदनगर जिल्ह्यात या ठिकाणी वेश्या व्यवसायावर छापा, तीन महिलांची सुटका

Raid on prostitution Business in this place in Ahmednagar district

Ahmednagar | अहमदनगर: नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल लोकसेवा येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

जुबेर जमालभाई वय ४२, भैय्या उर्फ जमालभाई, सतीश दशरथ होंडे, संदीप राजेंद्र वांढेकर वय ३६, सोमनाथ छगन घागरे वय २८ असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नगर औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलीस उप अधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी नगर औरंगाबाद रोडवरील खोसपुरी शिवारातील हॉटेलवर छापा टाकला. त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी झाडाझडती घेऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.  

Web Title: Raid on prostitution Business in this place in Ahmednagar district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here