रेल्वे मार्गाच्या कठड्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Ahmednagar | पुणतांबा: येथील पुणतांबा दौंड लोहमार्गावर चांगदेवनगर येथील भुयारी मार्गाच्या कठड्यावरून तरुणाचा तोल जाऊन पडल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाला आहे.
ही घटना २० मे रोजी घडली. चांगदेव नगर ते गणपती मंदिर रोडवर रेल्वे भुयारी मार्गे असल्याने याच्या कठड्यावरून नारायण कारभारी गायकवाड वय ३२ रा. चौधरी वस्ती, जळगाव यांचा तोल जाऊन पडल्याने जबर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाला झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेची खबर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. बी. मंडलिक हे करीत आहे.
Web Title: Young man death after falling off railway tracks