Home संगमनेर संगमनेर: गोवंश हत्या करणाऱ्या कत्तलखान्यावर छापा, दोघांना अटक, ११ लाखाचा मुद्देमाल जप्त-Raid

संगमनेर: गोवंश हत्या करणाऱ्या कत्तलखान्यावर छापा, दोघांना अटक, ११ लाखाचा मुद्देमाल जप्त-Raid

Raid on slaughterhouse, 2 arrested, 11 lakh confiscated

संगमनेर | Sangamner: बेकायदा गोवंश हत्या करणाऱ्या कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापा (Raid) टाकत ५०० किलो गोमांसांसह चार वाहने, सात जनावरे, एक गोन्हा व एक वासरू असा एकूण ११ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ५ जुलै) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रोड या ठिकाणी करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी (वय १९) व सलीम मुस्ताक कुरेशी (वय २४, दोघेही रा. कोल्हेवाडी रोड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील काटवनात छुप्या पद्धतीने बेकायदा कत्तलखाना सुरू असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. माहिती समजताच मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे पोलीस पथकाला आढळले. यामध्ये ३०० किलो तर बाहेरील बाजूस उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनातून २०० किलो असे एकूण ५०० किलो गोवंशाचे मांस हस्तगत केले. यावेळी सुमारे १० लाख ५० हजार रुपये किमतीची चार वाहने आढळून आली. तसेच ७ जनावरे, एक गोन्हा व एक वासरू ताब्यात घेतले. आहे. असा एकूण ११ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी साहिल उर्फ साद कुरेशी व सलीम कुरेशी यांना ताब्यात घेत अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे करीत

Web Title: Raid on slaughterhouse, 2 arrested, 11 lakh confiscated

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here