Home अहमदनगर संतापजनक: सख्ख्या मावस बहिणीवर शारीरिक अत्याचार

संतापजनक: सख्ख्या मावस बहिणीवर शारीरिक अत्याचार

 

Sexual abuse of a number of mothers and sisters rahuri

Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील सडे परिसरात बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.  एका तरुणाने सख्ख्या मावस बहिणीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार (Sexual abuse) केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. यामधील आरोपी काही महिन्यांपूर्वी रस्ता अपघातात मृत झाला आहे.  

सडे परिसरात एप्रिल 2021 पासून वेळोवेळी पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बाबतीत ही घटना घडली. या घटनेतील पीडित मुलगी व मयत आरोपी हे नात्याने एकमेकांचे सख्खेे मावस बहीण-भाऊ आहेत. आरोपीने एप्रिल 2021 पासून त्याच्या मावस बहिणीसोबत वेळोवेळी जबरी अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला राहुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांची तक्रार देण्याची तयारी नसल्याने तेथील डॉ. जयंत कुलकर्णी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.

घटनेनंतर पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र या घटनेतील आरोपी तीन महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये रस्ता अपघातात मयत झाला आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून मयत आरोपीवर पोस्को अंतर्गत शारिरीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of a number of mothers and sisters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here