Home महाराष्ट्र राज्यात आज मुसळधार पाऊस; नाशिक, पुण्यासह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात आज मुसळधार पाऊस; नाशिक, पुण्यासह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Alert: आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही आज अतिमुसळधार पाऊस.

Rain Alert Heavy rain in the state today

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मान्सून सक्रीय होत असून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापले आहे.

मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावेल. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत यलो अलर्ट आहे.

नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.  येत्या 4, 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Rain Alert Heavy rain in the state today

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here