Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टीचा इशारा
Rain Red Alert: २१ जुलैसाठी ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी.
मुंबई: राज्यात पावसाचे तांडव सुरू असतानाच मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने २१ जुलैसाठी ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
गुरुवारी सकाळी ८:३० वाजेता संपलेल्या २४ तासांत मुंबई महानगर प्रदेशात बहुतांश ठिकाणी पावसाने २०० मिलिमीटरचा टप्पा पार केला. पाच दिवसांसाठी जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Web Title: Rain Alert state is still under heavy rain warning
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App